Talks between Russian and Ukrainian officials on the Belarusian border have ended
रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये बेलारुस सीमेवर सुरु झालेली चर्चा पूर्ण
बेलारुस : रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये बेलारुस सीमेवर काल सुरु झालेली चर्चा पूर्ण झाली आहे. रशियानं क्रायमिया आणि डोनबाससह सर्व भागांमधून आपलं सैन्य मागं घ्यावं, अशी मागणी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांच्या कार्यालयानं या चर्चेत केली.
चर्चेच्या दुसऱ्या फेरीआधी विचार विनिमय करण्याकरता दोन्ही देशांचे प्रतिनिधी आपआपल्या राजधानीला परततील.
चर्चेची दुसरी फेरी पोलंड-बेलारुस सीमेवर होणार असल्याचं वृत्त स्पुटनिकनं दिलं आहे.
बेलारुस सीमेवरच्या गोमेल शहरात उभय देशांच्या प्रतिनिधींशी ही चर्चा काल सुरु झाली. त्यावेळीही युक्रेनमधल्या शहरं आणि उपनगरांमध्ये जोरदार गोळीबार सुरुच होते.
युरोपीय संघाचं सदस्यत्व युक्रेनला मिळावं यासाठी अधिकृत विनंती पत्रावर आपण सही केली असल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केलं. त्याचवेळी ही चर्चा संपली.