आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची – नरेंद्र मोदी

The role of technology is very important in building a self-reliant India – Narendra Modi

आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची – नरेंद्र मोदी

Prime Minister Narendra Modi
File Photo

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

ते आज तंत्रज्ञान आधारित विकास या विषयावरच्या वेबिनारमधे बोलत होते. सामान्य माणसाला सक्षम करण्यसाठी तसंच स्वयंपूर्ण भारताकरता मजबूत पाया तयार करण्यासाठी तंत्रज्ञान हे अभावी माध्यम आहे, असं ते म्हणाले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान ही परस्परांपासून अगदी वेगळी क्षेत्रं नाहीत, ती दोन्ही डिजीटल अर्थव्यवस्थेशी घट्ट जोडलेली आहेत. आणि त्यांचा पाया आधुनिक तंत्रज्ञान हाच आहे.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वंयपूर्णता आणण्यावर सरकारचा भर असून त्यादृष्टीनं अनेक पावलं उचलली आहेत. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धीमत्ता, ड्रोन्स, अंतराळ तंत्रज्ञान, स्वच्छ तंत्रज्ञान अशा झपाटयानं पुढं येणाऱ्या क्षेत्रांवर भर दिलेला आहे, असं त्यांनी सांगितलं.

सर्व क्षेत्रांमधल्या तंत्रज्ञानात मेक इन इंडियाचा अवलंब केल्यानं सुरक्षितता आणि स्वयंपूर्णतेची जाणीव निर्माण होईल, असं ते म्हणाले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *