राज्यात लागू केलेले निर्बंध विविध ठिकाणी लसीकरण आणि पॉझिटिव्हिटी दरानुसार आणखी शिथील

Restrictions imposed in the state will be further relaxed in terms of vaccination and positivity rates at various places

राज्यात लागू केलेले निर्बंध विविध ठिकाणी लसीकरण आणि पॉझिटिव्हिटी दरानुसार आणखी शिथीलGovernment of Maharashtra Mantralaya

मुंबई : कोविड १९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये बदल करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. त्यानुसार  राज्याच्या विविध भागातला कोवीडचा प्रादुर्भाव, लसीकरणाचं प्रमाण, कोविड  पॉझिटिव्हिटीचं प्रमाण आणि कोविड रुग्णांच्या खाटांची संख्या या गोष्टींचा आढावा घेऊन संबंधित विभागात निर्बंध कठोर अथवा शिथिल केले जातील. येत्या ४ तारखेपासून पुढच्या आदेशापर्यंत हे नवे नियम लागू राहणार असल्याचं शासनानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

नवी नियमावली   लागू करताना  राज्यातल्या सर्व महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनं स्वतंत्र युनीट म्हणून गृहीत धरले जातील. ज्या प्रशासकीय विभागातकोविड लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांचं प्रमाण ९० टक्के आहे, दुसरी मात्रा ७० टक्के पेक्षा जास्त नागरिकांनी घेतली आहे, पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यापेक्षा कमी आहे तर ऑक्सिजन सुविधे  सह कोविड खाटांची संख्या ४० टक्क्याहून कमी आहे, अशा विभागांचा समावेश गट अ मध्ये करण्यात आला आहे. गट अ मध्ये समावेश असलेल्या भागातले  शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमा हॉल, उपहारगृह, बार. क्रीडा संकुलं, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळं , नाट्यगृह, पर्यटन स्थळं, मनोरंजन पार्क या ठिकाणी १०० टक्के क्षमतेनं सुरु ठेवण्याची  परवानगी देण्यात आली आहे.
नव्या नियमावलीनुसार मोठ्या प्रमाणात जनतेशी संपर्क होतो अशा आस्थापनांमधले  सर्व कर्मचारी,  घरपोच सेवा पुरवणारे,  सार्वजनिक वाहनांचा  वापर करणारे प्रवासी, मोल, सिनेमा गृह, नाट्यगृह, पर्यटन स्थळं, उपाहारगृह, क्रीडा संकुलं, धार्मिक स्थळं, अशा ठिकाणी येणाऱ्यांचं संपूर्ण लसीकरण आवश्यक आहे.

गट अ मध्ये येणाऱ्या विभागात सर्व सार्वजनिक कार्यक्रमांच्या उपस्थितीवर २०० जण अथवा  ५० टक्के यापैकी कमी संख्येची  मर्यादा असेल. सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ऑफलाईन वर्ग सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असून सर्व पूर्व-प्राथमिक आणि आंगणवाडी शाळांमध्ये पूर्ण क्षमतेनं प्रत्यक्ष  वर्ग सुरु करता येतील.
अ गटात समावेश नसलेल्या प्रशासकीय विभागात  मात्र या सर्व आस्थापनांमध्ये  ५० टक्के मर्यादा कायम राहील. सरकारी आणि खासगी कार्यालयं तसंच औद्योगिक आस्थापना  पूर्ण क्षमतेनं सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांनी १०० टक्के लसीकरणावर जोर द्यावा तसंच  अ गटा बाहेरच्या विभागांनी  घरोघरी जाऊन लसीकरण करावं असे निर्देश देण्यात आले आहेत.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *