Nawab Malik’s ED remand extended till next Monday
नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत येत्या सोमवारपर्यंत वाढ
मुंबई: फरारी गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीत येथील विशेष न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्राचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ केली.
दक्षिण मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात सुमारे पाच तास चौकशी केल्यानंतर 23 फेब्रुवारीला मलिक यांना अटक करण्यात आली.
गुरुवारी प्राथमिक कोठडी संपल्यानंतर त्यांना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन.रोकडे यांच्यासमोर हजर करण्यात आले.
या प्रकरणी २३ फेब्रुवारी ईडीनं सुमारे पाच तास चौकशी केल्यानंतर मलिक यांना अटक केली होती. मात्र प्रकृती बिघडल्यानं मलिक यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे आधी दिलेल्या कोठडीतले तीन -चार दिवस वाया गेले आहेत. त्यामुळे त्यांची कोठडी वाढवावी, अशी विनंती ईडीच्या वतीनं अतिरिक्त सॉलिस्टर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला आज केली. ती न्यायालयानं मान्य केली.
दाऊद इब्राहिम आणि इतरांविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अलीकडेच दाखल केलेल्या एफआयआरवर ईडीचा खटला आधारित आहे. एनआयएने बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) कलमांखाली आपली फौजदारी तक्रार दाखल केली होती.