The Prime Minister will pay a one-day visit to Pune tomorrow 6th March
प्रधानमंत्री उद्या ४ मार्च ला एका दिवसीय पुणे दौऱ्यावर
पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एका दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री पुणे महानगरपालिकेच्या आवारातल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करतील.त्यानंतर साडेअकराला ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. एकूण ३२ किलोमीटर लांब असणाऱ्या या प्रकल्पाच्या १२ किलोमीटर लांबीच्या मार्गाचं उद्घाटन ते करतील.
वेगवान वाहतूकीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. गरवारे मेट्रो स्थानकाची पाहणी ते करणार असून तिथल्या प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ते गरवारे स्थानकापासून आनंदनगर स्थानकापर्यंत मेट्रोनं प्रवास करतील.दुपारी १२ वाजता मुळा- मुठा नदीच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणी ते करतील.
९ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा खर्च १ हजार ८० कोटी रुपये एवढा आहे. या प्रकल्पाअंतर्गत एकूण ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जातील. त्यानंतर ते बाणेरमधल्या १०० इ बस आणि इ बस आगारांचं तसंच बालेवाडीतल्या आर के लक्ष्मण गॅलरी आणि संग्रहालयाचं उद्घाटन ते करणार आहेत. दुपारी पावणे दोन वाजता सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होईल.