यूक्रेनमधून ११ हजार भारतीय मायदेशी दाखल

11,000 Indians repatriated from Ukraine

ऑपरेशन गंगा अंतर्गत यूक्रेनमधून ११ हजार भारतीय मायदेशी दाखल

नवी दिल्ली : ऑपरेशन गंगा अंतर्गत आत्तापर्यंत सुमारे ११ हजार भारतीयांना युद्धग्रस्त यूक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी आज सकाळी केलेल्याMinister of State for External Affairs V. Muralitharan ट्विटमध्ये भारतीय मोहीम, विविध देशांची सरकारं आणि स्वयंसेवकांनी ऑपरेशन गंगामध्ये सतत पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

आत्तापर्यंत २० हजाराहुन अधिक भारतीयांनी युक्रेनच्या सीमा ओलांडल्या आहेत. गेल्या २४ तासात सुमारे चार हजार भारतीयांना घेऊन १८ विमानं भारतात दाखल झाली आहेत असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं. पुढच्या २४ तासांत १६ उड्डाण होणार आहेत असंही ते म्हणाले.

युक्रेनचे शेजारी देश रोमानिया, पोलंड आणि स्लोव्हाकिया इथल्या ६२९ विद्यार्थ्यांना घेऊन आज तीन C-17 विमानं हिंडन विमानतळावर उतरली आहेत.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी हिंडन विमानतळावर ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधून सुरक्षित पणे बाहेर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तरुण आणि शूर विद्यार्थ्यांच्या चेहर्यातवरचा आनंद आणि दिलासा बघून मला आनंद झाला आहे असं ते म्हणाले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *