राज्यात येत्या दोन दिवसात सर्वत्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

Chance of rain in sparse places all over the state in next two days

राज्यात येत्या दोन दिवसात सर्वत्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज असून, काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असाWeather Forecast Image अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

विदर्भात तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं होतं. कोकणात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. विदर्भात बऱ्याच ठिकाणी दिवसाच्या तापमानात  किंचित वाढ झाली. विदर्भात रात्रीच्या तापमानात मोठी वाढ झाली तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात किंचित वाढ झाली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *