युक्रेनमध्ये अडकलेल्या अडीच हजार भारतीयांना १३ विमानं आज मायदेशी आणणार

Thirteen planes will bring home 2,500 Indians stranded in Ukraine today

युक्रेनमध्ये अडकलेल्या अडीच हजार भारतीयांना १३ विमानं आज मायदेशी आणणार

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन ऑपरेशन गंगाअंतर्गत विशेष विमान आज पहाटे मुंबईत पोचलं.  रोमानियाची राजधानी बुखारेस्ट इथून निघालेल्या  या विमानातून १८२ भारतीय मायदेशीIndians stranded in Ukraine reached in Mumbai परतले आहेत. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं.
२१० भारतीय नागरिकांना घेऊन भारतीय हवाई दलाचं एक विमान दिल्लीजवळच्या हिंडन विमानतळावर आज सकाळी पोचलं.

आणखी १३ विमानं, युक्रेनमध्ये अडकलेल्या अडीच हजार भारतीयांना घेऊन आज भारतात येणार असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं. ऑपरेशन गंगाअंतर्गत या आधीच १३ हजारापेक्षा जास्त भारतीयांना मायदेशी परत आणलं असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे.
खारकिवमधली स्थिती गेल्या काही दिवसात गंभीर झाली असल्यानं तिथल्या बहुतांश भारतीयांनी खारकीव शहर सोडलं आहे. युक्रेनमधल्या सुमी या भागावर आता जास्त भर द्यावा लागणार आहे.

तिथल्या विद्यार्थ्यांचं स्थलांतर करण्यासाठी भारत सर्व संबंधिताच्या संपर्क असून, त्यासाठी युद्धविराम हा सगळ्यात चांगला पर्याय आहे.

भारतीय विद्यार्थांना स्थलांतरासाठी सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी स्थानिक पातळीवर युद्धविराम करण्यासाठी भारत रशिया आणि युक्रेनवर दबाव आणत असल्याचं बागची यांनी सांगितलं. दरम्यान, पिसोचीनमधून सर्व भारतीयांना हलवलं असून त्यांच्या प्रवासादरम्यान आपण सातत्यानं त्यांच्या संपर्कात असल्याचं भारतीय दूतावासानं सांगितलं.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *