डेव्हिस चषक पुरुष टेनिस स्पर्धेतील जागतिक अ गटात भारताने डेन्मार्क चा ४-० असा धुव्वा

डेव्हिस चषक पुरुष टेनिस स्पर्धेतील जागतिक अ गटात भारताने डेन्मार्क चा ४-० असा धुव्वा

India beat Denmark 4-0 to stay put in Davis Cup Tennis World Group 1 Playoff

दिल्ली :  डेव्हिस चषक पुरुष टेनिस स्पर्धेतील जागतिक अ गटात काल भारताने डेन्मार्क चा ४-० असा धुव्वा  उडवला.Davis Cup 2022- Delhi

दिल्ली इथं काल झालेल्या सामन्यात भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण यांच्या झंजावातापुढे डेन्मार्कच्या फ्रेडरिक निकलसन आणि मिखाईल टोपरेगार्ड यांच्या ११८ मिनिटांच्या लढ्याला यश आले नाही आणि भारतीय जोडीनं पहिला सेट हरल्यानंतरही पुढचे २ सेट सलग जिंकत दुहेरी सामना आणि मालिका खिशात घातली.

यापूर्वी शुक्रवारी खेळलेल्या सामन्यांत भारताच्या राजकुमार रामनाथन आणि युकी भाम्बरी यांनी आपल्या एकेरी लढती जिंकून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती  तर काल झालेल्या तिसऱ्या एकेरी लढतीत भारताच्या राजकुमार रामनाथन याने पाहुण्या जोहान्स इंगिल्ड्सन याचा ५-७, ७-५, १०-७ असा  पराभव केला.

पाच सामान्यांच्या मालिकेतील पाचवा सामना खेळाला गेला नाही.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *