विद्यापीठाकडून प्राध्यापकांना नागरी संरक्षणाचे धडे

Civil defense training for professors from the university, Student Development and a joint venture of the Government of Maharashtra

विद्यापीठाकडून प्राध्यापकांना नागरी संरक्षणाचे धडे, विद्यार्थी विकास आणि महाराष्ट्र शासनाचा संयुक्त उपक्रम

पुणे  : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि महाराष्ट्र शासन,गृह विभाग नागरी संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ ते ११ मार्च, २०२२ या कालावधीत पुणे शहरातीलCivil Defense Maharashtra महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी नागरी संरक्षण प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ.विलास उगले, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक अनिल आवारे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे व प्रशिक्षणार्थी प्राध्यापक उपस्थित होते.

यावेळी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर म्हणाले की, शासनाच्या बरोबरीने काम करणारी समाजातील अतिरिक्त फौज आवश्यक असते. नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींची तीव्रता कमी होण्यास यामुळे निश्चितच मदत होईल. आपत्ती प्रवण ग्रस्त ठिकाणे आपण शोधू शकलो तर निदान आपत्ती येण्यापूर्वी आपल्याला काही उपाययोजना त्यावर करता येतील. या महत्वपूर्ण शोधांमुळे भविष्यातील अनेक आपत्ती आपण टाळू शकतो. आपण प्राध्यापक प्रशिक्षित झाला तर आपले हे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य होईल.

उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी या कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल विद्यापीठाचे आभार मानले. १९६८ साली स्थापन झालेला हा कायदा नागरिकांच्या संरक्षणासाठी अतिशय महत्वाचा आहे. अगदी साध्या अपघातांपासून ते भूकंपापर्यंत नागरिकांनी स्वताचे संरक्षण कसे करावे याकरीता हे प्रशिक्षण महत्वाचे आहे. एक सुजान नागरिक घडविण्यासाठी हे प्रशिक्षण अतिशय महत्वाचे आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक अनिल आवारे यांनी केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *