The PM interacted with the Janausdhi beneficiaries
प्रधानमंत्र्यांनी जनौषधी लाभार्थ्यांशी साधला संवाद
नवी दिल्ली : देशातल्या मध्यम आणि गरीब वर्गाला आरोग्यावर करावा लागणारा खर्च कमी व्हावा हेच सरकारचं उद्दीष्ट आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
त्यांनी आज जनौषधी दिनानिमित्त प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परीयोजनेचे लाभार्थी तसंच जनौषधी केंद्र चालकांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या योजनेच्या लाभार्थ्यांनी या योजनेचे लाभ आणि इतर माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावी, असं आवाहन त्यांनी केलं.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी जनौषधी सप्ताहाची माहिती दिली. जनौषधी योजना देशात मूक क्रांती आणणारी ठरली.
महिलांच्या आरोग्य सुरक्षेत या योजनेची मोठी भूमिका आहे, असं ते म्हणाले. दररोज १० लाखापेक्षा जास्त रुग्ण जनौषधी केंद्रांमधून औषधं खरेदी करतात. एका वर्षात १ हजार १३२ जनौषधी केंद्र सुरु झाली. १ ते ७ मार्च या जनौषधी सप्ताहात दीड लाख नवे जनौषधी मित्र तयार झाले, असं त्यांनी सांगितलं.