पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीवर कर कपात केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात वेग – प्रधानमंत्री

Tax cuts on infrastructure investment accelerate the growth of the country’s economy – Prime Minister

पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीवर कर कपात केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात वेग – प्रधानमंत्री

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘आकांक्षी अर्थव्यवस्था आणि वाढ यासाठी आर्थिक मदत’ या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले. पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलेले हे या प्रकारचे,PM Narendra Modi दहावे वेबिनार होते.

सुरवातीलाच पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उपस्थितांचे अभिनंदन केले आणि म्हणाले की भारताच्या अर्थमंत्री एक महिला आहेत, ज्यांनी एक प्रागतिक अर्थसंकल्प दिला आहे.

ग्रामीण भारताकडे जाणारे डिजिटल महामार्ग बांधण्याचं महत्व आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केलं. ‘प्रगती आणि आकांक्षाभिमुख अर्थव्यवस्थेसाठी गुंतवणूक’ या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये ते आज बोलत होते.

ग्रामीण जनतेच्या गरजा भागवणाऱ्या आर्थिक समावेशन उपक्रमांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, असं ते म्हणाले. महामारीनंतर भारतीय अर्थव्यवस्था वेगानं प्रगती करत असून आतापर्यंत सरकारनं लागू केलेले मूलभूत बदल आणि सुधारणा किती योग्य होत्या हे त्यावरून सिद्ध होतं. या प्रगतीचा वेग कायम ठेवण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पत सरकारनं अनेक सुधारणा सुचवल्या आहेत. केंद्र सरकारनं पायाभूत सुविधांवरच्या गुंतवणूकीवर कर कपात केली तसंच परदेशी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन दिलं आहे.

भारताच्या आकांक्षा आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांच्या परस्पर संबंधांवर पंतप्रधानांनी भर दिला. “आम्ही अनेक मुलभूत बदल केले आहेत आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उयोगांना मजबूत करण्यासाठी नव्या योजना तयार केल्या आहेत. या योजनांचे यश त्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्यावर अवलंबून आहे,” ते म्हणाले.

फिन-टेक, ऍग्रीटेक, मेडीटेक आणि कौशल्य विकास या क्षेत्रात देश पुढे गेल्या शिवाय चौथी औद्योगिक क्रांती शक्य नाही, यावर पंतप्रधानांनी भर दिला. या क्षेत्रांत वित्तीय संस्थांच्या मदतीने भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीत नवनवी शिखरे पादाक्रांत करेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

नवीन व्यवसाय क्षेत्रं शोधणं, भविष्यवेधी कल्पना राबवणं, तसंच शाश्वत जोखीम व्यवस्थापनाची तयारी ठेवली तरचं देशातील नवीन उद्योजक आणि स्टार्ट अप्स ना पाठबळ मिळेल असं ते म्हणाले.

आर्थिक क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध असून ७५ जिल्ह्यांमधल्या ७५ डिजिटल बँकिंग शाखा उघडणं, तसच केंद्रीय बँकेचं डिजिटल चलन सुरु करण, यामधून सरकारचा भविष्यवेधी विचार दिसून येतो, असं ते म्हणाले. देशानं २०७० सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाच उद्दिष्ट ठेवलं असून त्यासाठी पर्यावरण स्नेही प्रकल्प राबवण्याची गरज असल्याचं  त्यांनी यावेळी सांगितलं.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *