आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन

Organizing various programs across the country on the occasion of International Women’s Day

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन

नवी दिल्ली :  जागतिक महिला दिन आज सर्वत्र साजरा होत आहे. “पूर्वग्रह तोडा” ही यंदाच्या महिला दिनाची संकल्पना आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत गेल्या 1 मार्चपासूनच महिला दिनWomen Days Celebration in Delhi सप्ताह राजधानी नवी दिल्लीत साजरा होत असून आज समारोपाच्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
2020 आणि 2021 या दोन वर्षातले मिळून 28 पुरस्कार 29 महिलांना आजच्या सोहळ्यात प्रदान केले जाणार आहेत.महाराष्ट्रातल्या डाऊन सिंड्रोम पीडित नृत्यांगना सायली आगवणे, पहिल्या महिला सर्परक्षक वनिता बोराडे आणि उद्योजिका कमल कुंभार या तिघींचा विजेत्यात समावेश आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण २८ महिलांना २०२० आणि २०२१ या वर्षाचे ‘नारीशक्ती पुरस्कार’ प्रदान केले. यात राज्यातील तीन महिलांचा समावेश आहे. कथक नृत्यांगना सायली आगवणे, सर्पमित्र वनिता बोराडे आणि उद्योजिका कमल कुंभार अशी त्यांची नावे आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. विविध क्षेत्रात महिला चमकदार कामगिरी करीत असून त्यांची स्वप्नं साकार करण्यासाठी तसंच त्यांच्या सुरक्षा आणि सन्मानासाठी सर्वांनीच पुढे यावं असं राष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महिलांप्रति कोणत्याही प्रकारे दुजाभाव नसावा, त्यांच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी तसंच त्यांना समान संधी मिळावी याकरता सर्वांनी प्रयत्न करावे असं आवाहन नायडू यांनी केलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या महिला दिनी नारीशक्तीला सलाम केला आहे.  महिलांचा सन्मान राखून त्यांना संधीची नवनवी दालनं उघडून देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील राहील असं ट्विट त्यांनी केलं आहे. वित्तीय समावेशन, सामाजिक सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, निवास, आणि उद्योजकता अशा विविधांगी विकासात सरकार महिलांना साथ देत राहील असं त्यांनी म्हटलं आहे.
महिला दिनानिमित्त कच्छमधे आयोजित “महिला संतांचं समाजात योगदान” या विषयावरच्या कार्यक्रमात मोदी यांचं भाषण आज संध्याकाळी होणार आहे.केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी यंदाचा महिला दिन सोहळा महिलांच्या नेतृत्वात विकास घडवण्याचा सोहळा म्हणून साजरा व्हावा अशा शुभेच्छा ट्विटरद्वारे व्यक्त केल्या आहेत.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *