India expresses concern over Ukraine-Russia conflict at UN Security Council
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये भारताकडून युक्रेन – रशिया संघर्षाबाबत चिंता व्यक्त
भारताने म्हटले आहे की, युक्रेनमधली संघर्ष स्थिती बिकट होत असून तिथल्या नागरिकांवर ओढवलेल्या संकटावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे, असं मत भारतानं काल संयुत राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये व्यक्त केलं.
युक्रेनमधील मानवतावादी संकटावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने बोलावलेल्या बैठकीत भारताने सांगितले की, गेल्या 11 दिवसांमध्ये युक्रेनमधून 15 लाख लोकांना स्थलांतर करावं लागलं असून मानवतेवर हे मोठं संकट असल्याचं भारताचे संयुक्त राष्ट्रांमधले कायमस्वरूपी प्रतिनिधी टी. एस. तीरुमूर्ती यांनी सांगितलं.
युक्रेनच्या पूर्व भागातल्या सुमी विद्यापीठात भारताचे शेकडो विद्यार्थी अडकून पडले असून दोन्ही देशांना अनेक वेळा विनंती करूनही अद्याप या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढता आलं नसल्याचंचंही त्यांनी सांगितलं. युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या चर्चेच्या पहिल्या दोन फेऱ्या निष्फळ ठरल्यानंतर काल रात्री बेलारूसमध्ये झालेल्या तिसऱ्या फेरीत सकारात्मक चर्चा झाली. युक्रेनमधून नागरिकांना बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचंही दोन्ही देशांनी मान्य केलं.
श्री तिरुमूर्ती म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुन्हा एकदा दोन्ही बाजूंच्या नेतृत्वाशी बोलले आणि तात्काळ युद्धविराम करण्याच्या भारताच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला आणि दोन्ही पक्षांनी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत येण्याची गरज आहे. ते म्हणाले, भारताने युक्रेनमध्ये उरलेल्या भारतीय नागरिकांसह सर्व निष्पाप नागरिकांसाठी सुरक्षित आणि निर्बाध मार्गाच्या तातडीच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
ते म्हणाले, दोन्ही बाजूंनी वारंवार आग्रह करूनही सुमीमध्ये अडकलेल्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित मार्ग तयार झाला नाही याबद्दल भारताला खूप चिंता आहे.
श्री. तिरुमूर्ती यांनी गेल्या काही दिवसांत 20,000 हून अधिक भारतीय नागरिकांना परत आणल्याबद्दल युक्रेन आणि त्याच्या शेजारी देशांचे आभार मानले. इतर देशांतील नागरिकांनाही बाहेर काढण्याची भारताची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी असेही सांगितले की भारताने युक्रेनसाठी महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्या ‘फ्लॅश अपील’ आणि त्यांच्या प्रादेशिक निर्वासित प्रतिसाद योजनेचे स्वागत केले.
त्र, सीमेवरील परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याबाबत कोणताही तोडगा यावेळी झालेल्या चर्चेतून निघाला नाही. शस्त्रसंधी होण्यासाठी यापुढेही चर्चा सुरु ठेवण्यास तयार असल्याचं दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी सांगितलं. दरम्यान, रशियाच्या आक्रमणाविरोधात युक्रेनला यापुढंही मदत करण्याचा आणि रशियाला धडा शिकवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार कायम असल्याचं काल अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन या देशांनी काल स्पष्ट केलं. या चार देशांच्या प्रमुखांनी काल दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत युक्रेन प्रश्नावर चर्चा केली. हंगेरी सरकारनंही रशियाविरोधात कारवाईसाठी नाटो सैन्याला आपल्या देशात प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे, तर कॅनडानेही रशियाच्या 10 व्यक्तींवर निर्बंध लागू केले आहेत.
स्थायी सचिव म्हणाले, भारताने यापूर्वीच युक्रेन आणि त्याच्या शेजारी देशांना मानवतावादी मदत पाठविली आहे. यामध्ये औषधे, वैद्यकीय उपकरणे, तंबू, ताडपत्री, डोळ्यांचे संरक्षणात्मक उपकरण आणि इतर मदत सामग्रीचा समावेश आहे. ते म्हणाले, आम्ही अशा इतर गरजा ओळखण्याच्या आणि आणखी पुरवठा पाठवण्याच्या प्रक्रियेत आहोत.
श्री तिरुमूर्ती यांनी यावर जोर दिला की मानवतावादी कृती नेहमीच मानवतावादी सहाय्य, मानवता, तटस्थता, निःपक्षपातीपणा आणि स्वातंत्र्य या तत्त्वांद्वारे मार्गदर्शन केले जाते. याचे राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.