Public Awareness of Govt’s Public Welfare Schemes started by Folk Art Squads
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची लोककला पथकांद्वारे जनजागृती सुरू
पुणे : राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पुणे जिल्ह्यात लोककला पथकांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माहिती सहायक संदिप राठोड उपस्थित होते.
राज्य शासनाने दोन वर्षात विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी आणि ते शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावेत असा या मोहिमेचा उद्देश आहे. एक प्रकारे ‘योजनांची माहिती आपल्या दारी’ असे या जनजागृती मोहिमेचे स्वरुप आहे.