The World Health Organization (WHO) has warned that the epidemic is not over, despite the declining number of Covid patients
कोविड रुग्णांची संख्या कमी होत असली तरी महामारीचा धोका संपला नसल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
जगभरात कोविड रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही महामारीचा धोका अद्याप संपलेला नाही असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. या आजाराचं पृथ्वीवरुन समूळ उच्चाटन झाल्याखेरीज तो संपला असं म्हणता येत नाही असं हू चे महासंचालक जनरल टेडरॉस अधानॉम घेब्रेसस यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं.
रोगराईची टांगती तलवार अजूनही कायम असून लशी, चाचण्या आणि उपचारांची टंचाई अनेक ठिकाणी आहे.
अनेक देशांनी कोविड चाचण्यांचं प्रमाण कमी केलं असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अंटोनियो गुटेरस यांनीही घेब्रेसस यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला असून या विषाणूचा धोका टळला असल्याचं समजणं ही गंभीर चूक होईल असं म्हटलं आहे.
यासंदर्भात त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात, लशींचं वितरण अद्यापही असमान असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.