Bowling dominance in the second Test between India and Sri Lanka
भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजांचं वर्चस्व
मात्र श्रीलंकेच्या फिरकीसमोर श्रेयस अय्यर वगळता, भारताची आघाडीची फळी गडगडली. श्रेयस अय्यर यानं ९२ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला पहिल्या डावात सर्वबाद २५२ धावा करता आल्या. श्रेयस अय्यरच्या 98 चेंडूत 92 मुळे भारताला 252 पर्यंत मजल मारता आली , त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने यजमानांनी श्रीलंकेला 86/6 धावत रोखले.
श्रीलंकेसाठी फिरकीपटूंनी सर्वाधिक बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे भारतासाठी चमकले. बुमराहने सुरुवातीच्या दोन विकेट्स घेऊन सुरुवात केली त्यानंतर शमीने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेची महत्त्वाची विकेट घेतली. अँजेलो मॅथ्यूजने दुसऱ्या टोकाला विकेट्स तग धरून होता. त्याला निरोशन डिकवेलाच्या साथीत एक चांगली भागीदारी रचेल असं वाटत असतांचाच बुमराहने त्याला बाद केले . दिवस अखेर श्रीलंकेच्या 86/6 धावा झाल्या होत्या आणि थे 166 धावांनी पिछाडीवर आहे.
तत्पूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी डिनर ब्रेकपर्यंत भारताचा डाव 252 धावांवर आटोपला. श्रेयस अय्यर 98 चेंडूत 92 धावांवर बाद झाला तर जसप्रीत बुमराह धावा न करता नाबाद राहिला. अय्यर बाद झाल्यावर डिनर ब्रेक घेण्यात आला. यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने 26 चेंडूंत 39 धावा केल्या, तर हनुमा विहारीने 31 धावा केल्या. विराट कोहली चहाच्या विश्रांतीपूर्वी २३ धावांवर बाद झाला तर कर्णधार रोहित शर्माने १५ धावा केल्या.