पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात १८ वाहनांचा जाहीर ई-लिलाव

Public e-auction of 18 vehicles at Pimpri Chinchwad Sub Regional Transport Office

पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात १८ वाहनांचा जाहीर ई-लिलावपिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात १८ वाहनांचा जाहीर ई-लिलाव

पुणे : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या १८ वाहनांचा जाहीर ई-लिलाव पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे २३ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईनरित्या आयोजित करण्यात आला आहे.

लिलावातील वाहने पाहणीसाठी ११ मार्च ते २२ मार्च या कालावधीत कार्यालयीन वेळेत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड आवारात उपलब्ध आहेत. यामध्ये बस, ट्रक, डी. व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, रिक्षा, जेसीबी या वाहनांचा समावेश आहे. ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे.

ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव तहसिलदार व पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचनाफलकांवर माहितीसाठी लावण्यात आली आहे.

जाहीर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी १४ ते २० मार्च या कालावधीत https://eauction.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असणार आहे. नाव नोंदणीनंतर १४ ते २१ मार्च या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील खटला विभागात सकाळी १० ते सायंकाळी ६ प्रत्येक वाहनासाठी ५० हजार रकमेचा ‘उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड’ या नावे अनामत रक्कमेचा धनाकर्ष, ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी व कागदपत्रे पडताळणी, मंजुरीसाठी सादर करणे गरजेचे आहे.

लिलावाच्या अटी व नियम ११ मार्चपासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथील सूचना फलकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहील. ही वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जातील, असे कराधान प्राधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळवले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *