Minister of State for Home Affairs announces in the Legislative Council to launch a massive campaign in major cities to curb crime in the state.
राज्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये व्यापक मोहीम हाती घेण्याची गृह राज्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा.
कायदा आणि सुव्यवस्था तसंच जनतेच्या सुरक्षेला महाविकास आघाडी सरकारचं प्राधान्य असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून पोलिसांचं सुसूत्रीकरण आणि बळकटीकरण करण्यावर भर दिल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबईत विलेपार्ले इथल्या एका परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेचं वाटप झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा काही भाग वॉटसअपच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर आढळून आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.
वाळूचोरीला आळा घालण्यासाठी अशा गुन्ह्यातल्या आरोपींवर मोक्कातंर्गत कारवाई करण्याची सूचना सभापती रामराजे निबांळकर यांनी सभागृहाला केली, त्यासाठी मोक्का कायद्यात सुधारणा करण्याबाबत विचार केला जाईल, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या भाषणानं अर्थसंकल्पावरच्या चर्चेला सुरुवात झाली.