येत्या १६ मार्चपासून १२ ते १४ वर्ष वयोगटाच्या मुलांचं लसीकरण सुरु करायचा निर्णय

The decision to start vaccination of children in the age group of 12 to 14 years from next 16th March

येत्या १६ मार्चपासून १२ ते १४ वर्ष वयोगटाच्या मुलांचं लसीकरण सुरु करायचा निर्णयCOVID-19 vaccination

मुंबई :  येत्या १६ मार्चपासून १२ ते १४ वर्ष वयोगटाच्या मुलांचं कोविड लसीकरण सुरु करण्याचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे.

या टप्प्यात २००८, २००९ आणि २०१० साली जन्मलेल्या मुलांना कोर्बेवॅक्स लस दिली जाईल. हैदराबाद इथल्या बायोलॉजिकल इवान्सल औषध कंपनीनं या लसीचं उत्पादन केलं आहे.

तसंच येत्या १६ मार्चपासून ६० वर्षावरच्या सरसकट सर्व नागरिकांना कोविड लसीची वर्धक मात्रा मिळणार आहे. आतापर्यंत ६० वर्षावरच्या सह व्याधी असलेल्या नागरिकांना कोविडची वर्धक मिळत होती. देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमे अंतर्गत १४ वर्षावरच्या मुलांचं लसीकरण यापूर्वीच सुरु झालं आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *