India beat Sri Lanka by 238 runs in the second Test
दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेवर २३८ धावांनी विजय
बंगळूरू: बंगळूरू इथं झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतानं श्रीलंकेवर २३८ धावांनी विजय मिळवला. याबरोबर दोन सामन्यांची ही मालिकाही भारतानं २-० अशी जिंकली.
विजयासाठी ४४७ धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेनं, आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कालच्या १ गडी बाद २८ धावसंखेवरून आपला दुसरा डाव पुढे सुरु केला. काल खेळपट्टीवर टिकून राहिलेल्या कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि कुसल मेंडीस यांनी दुसऱ्या गड्यासाठी ९६ धावांची भागिदारी केली. मात्र त्यानंतर श्रीलंकेचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले, आणि अखेर त्यांचा दुसरा डाव २०८ धावांतच आटोपला.
दिमुथ करुणारत्नेनं शतकी खेळी करत १०७ धावा केल्या, तर कुसल मेंडीस यानं ५४ धावा केल्या.भारताच्या वतीन आर. अश्विन यानं ४, जसप्रित बुमराह यानं ३, अक्षर पटेल यानं २ तर रविंद्र जडेजा यानं श्रीलंकेचा एक गडी बाद केला.
श्रेयस अय्यरला खेळपट्टीवर त्याच्या दुहेरी अर्धशतकांसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले, ज्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना खूप मदत होते आणि फलंदाजीसाठी ती अतिशय अवघड होती अशा खेळपट्टीवर त्याने चांगली फलंदाजी केली.
भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला त्याच्या फलंदाजीच्या प्रभावी कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवडण्यात आले आणि त्याने यष्टीमागे ही उत्तम कामगिरी केली