सफाई कामगारांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवा

Provide all the necessary facilities to the janitors – Dr  P.P. Wawa, a member of the National Sanitation Commission

सफाई कामगारांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवा-राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा

पुणे : सफाई कामगारांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा, सुरक्षा साधने व कामकाजासाठी सयंत्रचा पुरवठा पुरविण्याची कार्यवाही करण्याचे तसेच सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश राष्ट्रीयDr. P.P. Wawa, सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी.पी. वावा यांनी दिले.

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

डॉ. वावा म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांसाठी पक्के घरे उपलब्ध करण्यासाठी चांगले काम करीत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या लाभ देण्याची कार्यवाही करावी. कार्यरत सफाई कामगारांना आवश्यक आरोग्य विषयक सेवासोबतच आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

सफाई कामगारांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करुन द्यावी. सुरक्षितेच्यादृष्टीने त्यांना विमा सरंक्षण देण्याची कार्यवाही करावी. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना तातडीने कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँकांच्या माध्यमातून मेळावे आयोजित करावे. कामगाराची कठीण समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तसेच आपल्या हक्कापासून सफाई कामगार वंचित राहणार नाही याकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

यावेळी अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सफाई कर्मचाऱ्यांशी देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत माहिती दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *