देशाची प्रगती प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वामुळेच – नितीन गडकरी

The country’s progress is due to the visionary leadership of Prime Minister – Nitin Gadkari

 देशाची प्रगती प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वामुळेच – नितीन गडकरी

नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेतृत्त्वच देशाला पुढे नेईल. आज देशाची प्रगती मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वामुळेच आहे, असं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये आज  विरोधीपक्षनेतेThe progress of the country is due to the visionary leadership of the Prime Minister - Nitin Gadkari देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

गोव्यात प्रचाराची जबाबदारी फडणवीस यांच्याकडे होती, त्यामुळे गोव्यात भाजपाची सत्ता आली. त्यासाठी त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. जात पंथ धर्म यावर उठून भाजपवर लोकांनी विश्वास दाखवला आहे, हे या निवडणुकीचे  वैशिष्ट्य  असल्याचं गडकरी म्हणाले.

नागपूर महानगरपालिकेत यंदा भाजपाचंच सरकार येणार असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. या वेळी बोलताना फडणवीस म्हणाले की. भारतीय जनता पार्टीला गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर इथं मिळालेलं बहुमत हे विकासाला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाच्या मनात जागवलेल्या विश्वासाला तसंच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केलेल्या विकास कार्याला आहे , सर्व देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास निर्माण झाला आहे.

चार राज्यांमधला विजय हा त्याचाच परिणाम आहे. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार महावसुली सरकार आहे. राज्यात पण सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहेत, असंही फडणवीस म्हणाले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *