होळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा.

Holi is celebrated everywhere with enthusiasm

होळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा.

नवी दिल्ली: देशभरात आज होळीचा सण सर्वत्र साजरा होत आहे. कोविड नियमांचं पालन करुन होळी आणि उद्याचा धुलिवंदनाचा सण साजरा करण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी देशवासीयांना होळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.Holi is celebrated everywhere with enthusiasm

होलिका दहन म्हणजे वाईट प्रवृत्तीवर सतप्रवृत्तीच्या विजयाचं प्रतिक आहे, असं नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. कुटुंबिय आणि मित्रपरिवारासह साजरा केला जाणारा रंगांचा सण होळी सर्वांच्या जीवनात शांतता समृद्धी तसंच आनंद घेऊन येवो, अशा शुभेच्छा नायडू यांनी दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनतेला धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात होलिकोत्सव उत्साहात साजरा होत आहे.

औरंगाबाद शहरात गुलमंडी इथं सामाजिक उपक्रमाद्वारे आज होलीका दहनाचं आयोजन केलं आहे. यावेळी अनाथ बालकांसमवेत उत्सव साजरा केला जाणार आहे. दुपारी चार ते रात्री दहा यावेळेत मान्यवरांच्या हस्ते होलिका दहन केलं जाईल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून शिमगोत्सवाला सुरुवात झाली. जिल्ह्यात ५३९ ठिकाणी सार्वजिनक आणि ५८८ ठिकाणी खासगीरित्या होळी उत्सव साजरा केला जाणार आहे. तर मानपानावरून वाद असलेल्या पाच गावात होलिकोत्सवाला बंदी आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार १२७  ठिकाणी होळी साजरी होत आहे.

शिमगोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस पथक तैनात केली आहेत. पोलीस प्रशासनानं ही माहिती  दिली.  जिल्ह्यात दीड, पाच, सात, पंधरा दिवस होलिकोत्सव साजरा केला जातो. होळी उत्सवात रासायनिक रंगांचा वापर करतात. मात्र त्याचे मानवी जीवनावर काय दुष्परिणाम होतात, याबाबत जनजागृती करण्यासाठी गोंदियातील रांगोळी चित्रकार सोनी भावना फूलसुगे या तरुणीनं सेव नेचर, सेव ट्री, सेव पीपल, या संकल्पनेवर रांगोळी साकारली आहे. वृक्षांची होणारी कत्तल थांबवून, होळीत जाळण्यासाठी परिसरातला केरकचरा गोळा करून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेशही या रांगोळीतून दिला आहे.

परभणी शहरातील जुना पेडगाव रोड आणि वसमत रोडवरच्या बालगृहातील अनाथ मुलांना रंगपंचमी साजरी करता यावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षानं नैसर्गिक कोरड्या रंगाचं वाटप केलं आहे.

धुळ्यात आज होळीचा सण साजरा करण्यासाठी चौका चौकात पाण्याचे हौद ठेवण्यात आले आहेत. सुमारे ३०० मित्र मंडळांना होळीसाठी परवानगी मिळाली आहे. होळीसाठी पेालिसांनी डीजे वाजवण्यास सशर्त परवानगी दिली आहे. होळी पेटवण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंत तसंच उद्या धुलिवंदनच्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत डिजे, लाऊडस्पिकर वाजवण्यास परवानगी दिली आहे. धुळे महापालिकेत आज सकाळी  होळी उत्साहात साजरी झाली. शिर्डी इथं श्री साईबाबा संस्थाळनाच्या वतीनं श्री गुरुस्था न मंदिरासमोर होळी पेटवण्याेत आली.

होळीनिमित्त यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा इथं अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या लेंगी महोत्सवात एकाहून एक नृत्य सादर होत आहेत.

काशी पोहरागड इथं महंत कबीरदास यांच्या उपस्थितीत हा महोत्सव सुरू आहे. बंजारा समाजात होळी सणाला अनन्यसाधारण महत्व. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील तांड्या तांड्यावर सध्या लेंगी नृत्य सादर होत आहे. लेंगी गीतातून विविध सामाजिक प्रश्नांविषयी जागृती करण्यात येते.रंगामुळे त्वचेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी शक्यतो नैसर्गिक रंगांचा वापर करावा, तसंच रंग खेळायला सुरुवात करण्यापूर्वी शरीरावर खोबऱ्याचं तेल लावण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *