India’s trade exports are likely to cross the 400 billion mark in the current financial year
भारताची व्यापारी निर्यात चालू आर्थिक वर्षात ४०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडण्याची शक्यता
नवी दिल्ली : भारताची व्यापारी निर्यात १४ मार्चपर्यंत जवळजवळ ३९० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे आणि चालू आर्थिक वर्षात ती नक्कीच ४०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल अस केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री
पियूष गोयल आज म्हणाले.
नवी दिल्ली येथे ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ACMA) द्वारे आयोजित आत्मनिर्भर उत्कृष्टता पुरस्कार सोहळा आणि ७ व्या तंत्रज्ञान शिखर परिषदेला गोयल संबोधित करत होते. भारतातील वाहनांच्या सुट्या भागांच्या उद्योगाने प्रथमच ६०० दशलक्ष डॉलर्स मूल्याच्या अतिरिक्त व्यापाराची नोंद केली आहे अशी त्यांनी सांगितल.
भारताचा स्वयंचिलत वाहन उद्योग १०० अब्जडॉलर्सपेक्षा जास्त आहे आणि देशाच्या एकूण निर्यातीमध्ये ८ टक्के वाटा आहे आणि भारताच्या जीडीपी मध्ये त्याचा २ पूर्णांक ३ दशांश टक्के वाटा आहे आणि २०२५ पर्यंत तो जगातील ३रा सर्वात मोठा उद्योग बनणार आहे,हे लक्षात घेतले पाहिजे.
कोविड-१९ ची आव्हाने, कंटेनरचा तुटवडा, चिपचा तुटवडा, कमोडिटीच्या किमती आणि संघर्ष अशा पाच प्रकारच्या कठीण आव्हानांना न जुमानता उद्योग सुरू ठेवल्याबद्दल आणि तशा विपरीत परिस्थितीला तोंड देत, समायोजन करत विकसित झालेल्या वाहन उद्योगातील उद्योजकांचे त्यांनी कौतुक केले.