उद्योग आणि व्यापार क्षेत्राला लाभ मिळवून देणारं २०२२ अभय योजना विधेयक विधीमंडळात मंजूर

Legislature approves 2022 Abhay Yojana Bill which will benefit industry and trade sector

उद्योग आणि व्यापार क्षेत्राला लाभ मिळवून देणारं २०२२ अभय योजना विधेयक विधीमंडळात मंजूर

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या वस्तू आणि सेवाकरासंदर्भातल्या अभय योजनेबाबतचं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. अर्थमंत्री अजित पवार यांनी हे विधेयक आज विधानसभेत मांडलं.Hadapsar News Vidhan Bhavan, Mumbai Hadapsar News

कोरोना काळात अडचणीत आलेल्या उद्योग आणि व्यापार क्षेत्राला या विधेयकाचा मिळेल.

वस्तू व सेवा कर (जीएसटी) अस्तित्वात येण्यापूर्वीच्या विविध करांसंदर्भातील ही योजना असून आवश्यक रकमेचा भरणा करण्यासाठी 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतचा कालावधी 

कर कायद्यांतर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये  10 हजार रुपयांची थकबाकी असल्यास सदर थकबाकीची रक्कम संपूर्णपणे माफ होणार, छोट्या व्यापाऱ्यांना 1 लाख प्रकरणात फायदा 

या अभय योजनेच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक रकमेचा एकरकमी भरणा विहित कालावधीत करावा लागेल. तथापि, ज्या व्यापाऱ्यांची एका आर्थिक वर्षाची थकबाकी 50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा व्यापाऱ्यांना अभय योजनेंतर्गत भरावयाच्या आवश्यक रकमेसाठी हप्ते सवलतीचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. एकूण हप्ते सवलत 4 भागात विभागली असून पहिला हप्ता 25 टक्के हा 30 सप्टेंबर 2022 पर्यंत भरणे आवश्यक आहे. उरलेले 3 हप्ते पुढच्या 9 महिन्यात भरावे लागणार आहेत. आवश्यक रकमेपेक्षा कमी भरणा केल्यास त्या व्यापाऱ्याला प्रमाणशीर लाभ देण्यात येईल.

मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारनं निवेदन देऊन आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश तालिका पीठासीन अधिकारी दीपक चव्हाण यांनी आज विधानसभेत दिले.

भाजपा सदस्य चंद्रकांत पाटील यांनी आज शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला होता. मराठा आरक्षणप्रश्नी राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांना राज्य सरकारनं दिलेल्या लेखी आश्वासनांची मुदत १५ मार्चला पूर्ण होऊनही याबाबत कुठलीही कार्यवाही झाली नसल्याची टीका पाटील यांनी यावेळी केली.

राज्यातल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मंजूर झालेली मँट्रिकोत्तर शिष्यवृत्ती परत न करणाऱ्या महाविद्यालयांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज  विधानसभेत जाहीर केलं. भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि राहूल कुल यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

महावितरणच्या वीजसंचमांडणीवर विजेचा धक्का लागून एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत झालेल्या ९३२ अपघातांमधे ९५५ नागरिकांना प्राण गमवावे लागल्याची  माहिती उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज विधानसभेत दिली. नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे सदस्य मोहन मते यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात त्यांनी  ही माहिती दिली. विजेचा धक्का लागून मरण पावलेल्या नागरिकांपैकी ३०२ व्यक्तींच्या वारसांना भरपाई देण्यात आली, तर ५५ मृत व्यक्तींच्या वारसांना भरपाई देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *