महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांग्लादेशावर ११० धावांनी विजय

Women’s Cricket World Cup: India beat Bangladesh by 110 runs in Hamilton

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांग्लादेशावर ११० धावांनी विजय

 

हॅमिल्टन येथील सेडन पार्क येथे झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारताने बांगलादेशचा 110 धावांनी पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.Hadapsar News Women's Cricket World Cup: India beat Bangladesh by 110 runs in Hamilton.

सामन्याची सुरुवात शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी संघाला उत्तम सुरुवात करून दिली आणि सलामीच्या विकेटसाठी ७४ धावांची भर घातली. मात्र, बांगलादेशने एकापाठोपाठ तीन गडी बाद केले.

यास्तिका भाटिया आणि ऋचा घोष यांनी त्यानंतर 50 पेक्षा अधिक धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली ,घोष 26 धावांवर झेलबाद झाली. त्यानंतर स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकर यांनी 48 धावा जोडून भारताला सन्माननीय धावसंख्या उभारण्यास मदत केली.

भारताने निर्धारित षटकांत 7 गडी गमावून 229 धावा केल्या. भारताकडून यास्तिका भाटिया 50, शफाली वर्मा 42 आणि पूजा वस्त्राकर 30 यांनी सर्वाधिक धावा केल्या.

प्रत्युत्तरात बांगलादेशची सुरुवात संथ झाली आणि त्यांनी ठराविक अंतराने विकेट गमावल्या. बांगलादेशचा डाव 40.3 षटकांत 119 धावांत आटोपला

भारताकडून स्नेह राणाने चार, तर पूजा वस्त्राकर आणि झुलन गोस्वामीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

भारताला स्पर्धेत स्थान मिळवण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी या विजयाची नितांत गरज होती.

Hadapsar News Bureau

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *