अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन महिन्याभरात – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

Adjustment of additional teachers within a month – School Education Minister Varsha Gaikwad

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन महिन्याभरात – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

 

मुंबई : ज्या शाळांत शिक्षकांची पदे रिक्त आहेत व काही ठिकाणी अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचे समायोजन महिन्याभरात केले जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी

Minister of School Education, Prof. Varsha Gaikwad.Hadapsar Latest News, Hadapsar News
File Photo

विधानसभेत दिली.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी पंचायत समिती अंतर्गत शिक्षकांच्या नियमबाह्य समायोजनाबाबत विधानसभा सदस्य संजीव रेड्डी बोदरकुवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता.’
याला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या,समायोजन करण्यासाठी 2017 च्या शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यात येतो. तसेच ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे तिथे शिक्षकांची आवश्यकता असल्याने स्थानिक प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शिक्षक पाठविण्याचा निर्णय घेतला जातो.

तसेच काही सदस्यांच्या याबद्दल तक्रारी असतील तर त्या तपासून घेऊ समायोजन करताना कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन केले जाणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल, असेही मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *