Booster dose for Tourism in Pune District, 406 Tourist Destinations will be developed.
Deputy Chief Minister Ajit Pawar directed a study plan to boost tourism development in the Pune district. He also said that 406 tourist centres have been identified by the Pune Zilla Parishad and while developing it, do not compromise on the quality and quality of its work.
Ajit Pawar, Deputy Chief Minister and Guardian Minister of Pune district instructed to study the 406 tourist destinations identified by the Zilla Parishad by preparing a comprehensive plan for the tourism development of Pune district and think about what facilities can be set up there.
A Pune District Tourism Development Review Meeting was held under the chairmanship of Deputy Chief Minister Ajit Pawar in the hall of the Divisional Commissioner’s Office. He was talking at the time.
On this occasion, Deputy Chief Minister Ajit Pawar further said, plan the funds provided by the Central and State Governments. Plant a large number of trees in tourist places. Deputy Chief Minister Ajit Pawar further said that the project initiated by MP Supriya Sule and Ang Vandana Chavan is commendable and I will try my best as the Guardian Minister of the district to get maximum funding for it. But the work should be conducive and quality to the people. There are many places for tourism in the Pune district. Tourist places should have parking arrangements. Also, care should be taken that there is no bad practice on the tourist spots. He further said that efforts should be made to declare other talukas as tourist destinations like Junnar taluka.
Land ownership and working manpower of 406 tourist places in the district, planned innovative tourism activities at Lonavla, tourist places at Pimpri-Chinchwad, development of Fort Sinhagad, erection of snack centre for encroachment holders at Bhimashankar, proposed measures for encroachment holders, special tourism area in the district. Through the festival, tourism development, agri-tourism, job creation from tourism, development of forts tourism etc. were reviewed.
Presentations were made by Tourism Development, Archeology Department, Zilla Parishad, Pune and Pimpri Chinchwad Municipal Corporation and Additional District Collector of Pune District Vijay Singh Deshmukh.
पर्यटन विकासाला चालना, पुणे जिल्हात ४०६ पर्यटन स्थळे विकसित केली जाणार.
पुणे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले . पुणे जिल्हा परिषदेकडून 406 पर्यटन केंद्र निश्चित आली आहेत, ही विकसित करताना त्याच्या कामांमध्ये दर्जा, गुणवत्तेत कोणत्याची प्रकारची तडजोड करू नका असेही ते म्हणाले.
पुणे जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी बृहत आराखडा तयार करुन जिल्हा परिषदेकडून निश्चित करण्यात आलेल्या 406 पर्यटन स्थळांचा अभ्यास करा, तिथे कोणकोणत्या सुविधा उभा करता येतील यावर विचार करा अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा पर्यटन विकास आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाने निधी दिला आहे त्याचे नियोजन करा. पर्यटन स्थळांवर मोठया प्रमाणावर वृक्षारोपण करा. पर्यटन विकासासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात कार्यशाळा घेऊन तज्ञांचे मार्गदर्शन घ्या असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे आणि ॲङ वंदना चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरु होणारा हा प्रकल्प स्तुत्य असून त्याबाबतीत जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. परंतु काम लोकांच्या सुविधेत भर पाडणारे व दर्जेदार असावे. पुणे जिल्ह्यात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत. पर्यटनाच्या ठिकाणी पार्कींग व्यवस्था असावी. तसेच पर्यटनाच्या ठिकाणी चुकीचे प्रकार होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. जुन्नर तालुक्याप्रमाणे अन्य तालुके पर्यटनस्थळे घोषित होण्याबाबत प्रयत्न करावेत, असेही ते पुढे म्हणाले.
यावेळी जिल्ह्यातील 406 पर्यटन स्थळांच्या जमिनीची मालकी व कार्यरत मनुष्यबळ, लोणावळा येथील नियोजित नावीन्यपूर्ण पर्यटन उपक्रम, पिंपरी-चिंचवडमधील पर्यटन स्थळे, किल्ले सिंहगड विकास, भीमाशंकर येथील अतिक्रमण धारकांसाठी अल्पोपहार केंद्र उभारणी, अतिक्रमण धारकांसाठी केलेली प्रस्तावित उपाययोजना, पुरातत्त्व विभाग, जिल्ह्यातील विशेष पर्यटन क्षेत्र, महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटन विकास, कृषी पर्यटन, पर्यटनातून रोजगार निर्मिती, गड किल्ले पर्यटन विकास आदींबाबत आढावा घेण्यात आला.
यावेळी पर्यटन विकास, पुरातत्व विभाग, जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सादरीकरण केले.