जगन्नाथ शेवाळे बापूंनी सबंध आयुष्य माणसं जोडण्याचे काम केले

Jagannath Shewale Bapu worked to connect people all his life – former Union Agriculture Minister Sharad Pawar

जगन्नाथ शेवाळे बापूंनी सबंध आयुष्य माणसं जोडण्याचे काम केले , अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे प्रतिपादन

हडपसर :जगन्नाथ शेवाळे बापूंनी कधी कोणते पद आपल्याकडे मागितले नाही.जो विचार स्विकारला त्यात त्यांनी कधी तडजोड केली नाही.लोकांशी बांधिलकी ठेवत संबंध आयुष्य बापूंनी माणसं जोडण्याचे काम केले. असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांनी केले.

माजी आमदार जगन्नाथबापू शेवाळे यांचा अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा मांजरी बुद्रुक येथील इंद्रप्रस्थ कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी ते बोलत होते.Jagannath Shewale Bapu worked to connect people all his life Hadapsar Latest News, Hadapsar News,हडपसर मराठी बातम्या

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, आमदार अशोक पवार,आमदार संजय जगताप,दिलीप सोपल, रमेश थोरात,सूर्यकांत पलांडे, दिलीप ढमढेरे, दिपक साळुंके, निर्मला पानसरे, राजलक्ष्मी भोसले,अशोक टेकवडे,दिलीप तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, सत्कार समिती अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर, सत्कार समिती कार्याध्यक्ष सुरेश घुले, निमंत्रक विक्रम शेवाळे, भारती शेवाळे,बंडू गायकवाड,योगेश सासणे, अनिल टिळेकर, अर्चना कामठे, दिलीप घुले,राहुल चोरघडे, गोपाळ म्हस्के, नंदूआबा घुले, रमेश घुले, कैलासमामा कोद्रे, दिनकर हरपळे, जितीन कांबळे, सुहास खुटवड, शिवाजी आदमाने आदींसह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

सार्वजनिक जीवनात काम करत असताना अनेकजण काही अपेक्षा ठेवत असतात. मात्र ,बापूंनी तशी अपेक्षा कधी ठेवली नाही.नेहेमी सर्वानुमते त्यांना पदे देण्यात आली.त्या पदांची गलीमाही त्यांनी कायम ठेवत पक्ष संघटन वाढवण्यासाठी काम केले ,असे गौरवोद्गारही शरद पवार यांनी यावेळी काढले.

देशातील राजकारण चुकीच्या दिशेने जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.काश्मीर फाईल्स सारख्या सिनेमातून तेड निर्माण केला जात आहे. त्यातून भविष्यात काही स्फोटक घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाज,राज्य आणि संपूर्ण देश एकसंध ठेवण्यासाठी आयुष्यभर काम करत राहिलो.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की जगन्नाथ बापू शेवाळे यांचा स्वभाव हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे.काँग्रेस आणि पुढे राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये बापू नेहेमीच शरद पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.पवार साहेबांनी घेतलेल्या भूमिका हाच पक्ष मानून आजवर बापूंचे काम सुरू आहे. एक कार्यकर्ता म्हणून बापूंच्या बरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणांची आज आठवण येते.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की जगन्नाथ बापूंनी अनेक पदे भूषवली व बदलली.मात्र,ते शरद पवार साहेबांच्या विचारांशी कायम एकनिष्ठ राहिले आहेत. पक्ष संघटनेत काम करताना शेवाळे बापूंनी संघटनेला बळ देण्याचे काम केले आहे.छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकर यांचे विचार पुढच्या पिढीला सांगण्यासाठी बापूंसारख्या ज्येष्ठ मार्गदर्शकांची आज गरज आहे.

दरम्यान सत्काराला उत्तर देताना माजी आमदार जगन्नाथ शेवाळे म्हणाले की शालेय जीवनापासून यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी काँग्रेस चा आणि पवारसाहेबनचा निष्ठावंत पाईक म्हणून आजवर वावरलो आहे. स्वर्गीय खासदार अण्णासाहेब मगर यांच्यामुळे माझ्या आयुष्याची जडघडण झाली.शेवाळे परिवाराला पवार साहेबांनी आपल्या कुटुंबाचा घटक मानले ही शिदोरी आयुष्यभर पुरणारी आहे.न मागताही साहेबांनी मला सर्वकाही दिले.साहेबांचे हे ऋण मी कधीही विसरणार नाही.

बापूंनी कधीही स्वतः चा वाढदिवस जाहीररीत्या साजरा केला नाही.त्याला त्यांचा नेहेमीच विरोध असायचा. मात्र, अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त घेतलेला आजचा हा सोहळा आम्हां शेवाळे कुटुंबासाठी खूप आनंददायी आहे.बापूंच्या समाजसेवेचा वारसा आम्ही असाच पुढे सुरू ठेवू, असा विश्वास यावेळी विक्रम शेवाळे यांनी व्यक्त केला.

शेवाळे परिवार यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते.प्रास्ताविक विक्रम शेवाळे यांनी केले.सूत्रसंचालन प्रसाद भारदे यांनी केले ,तर सुरेश घुले यांनी आभार मानले.

Hadapsar News Bureau

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *