राष्ट्रपतींची तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष सरदार बर्दी मोहम्मदोफ यांच्याशी शिष्टमंडळ पातळीवर चर्चा

Delegation-level talks between the President and the President of Turkmenistan, Sardar Berdymukhamedov

राष्ट्रपतींची तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष सरदार बर्दी मोहम्मदोफ यांच्याशी शिष्टमंडळ पातळीवर चर्चा

अशगबत: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज तुर्कमेनिस्तानची राजधानी अशगबत इथं तुर्कमेनिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सरदार बर्दी मोहम्मदोफ यांच्याशी शिष्टमंडळ पातळीवर चर्चा केली.Delegation-level talks between the President and the President of Turkmenistan Sardar Berdymukhamedov हडपसर मराठी बातम्या  hadapsar latest news, hadapsar news

यावेळी भारत आणि तुर्कमेनिस्तान दरम्यान अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. दोन्ही देशांदरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांची सद्यस्थिती आणि भविष्यात ते आणखी वृद्धिंगत होण्याच्या शक्यतांवर यावेळी चर्चा झाली.

विविध प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्वाच्या घडामोडींवर दोन्ही नेत्यांनी यावेळी विचार मांडले. दोन्ही देशांमधली भागीदारी, द्विपक्षीय तसंच आर्थिक संबंध आणखी मजबूत करण्यासाठीच्या प्रयत्नांना गती देण्यावर यावेळी सहमती झाली.

भारताची आर्थिक गुप्तचर संस्था आणि तुर्कमेनिस्तानची आर्थिक देखरेख सेवा यांच्या झालेल्या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांमधल्या आर्थिक सहकार्याच्या आराखड्याला बळकटी मिळेल असं राष्ट्रपती कोविंद यांनी यावेळी सांगितलं.

आपला देश भारत-मध्य आशिया शिखर संमेलनाच्या आराखड्यामध्ये भारताचा महत्वाचा भागीदार असून भारत-मध्य आशिया शिखर संमेलनात पारित झालेल्या रुपरेषे अंतर्गत सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देश सहमत असल्याचं तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रपतींनी सांगितलं.

Hadapsar News  Bureau

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *