शरद पवार यांनी प्रधानमंत्र्यांवर धर्मांधतेचा केलेला आरोप चुकीचा

Sharad Pawar’s allegation of bigotry against the Prime Minister is wrong – Ramdas Athavale

शरद पवार यांनी प्रधानमंत्र्यांवर धर्मांधतेचा केलेला आरोप चुकीचा आहे- रामदास आठवले

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर धर्मांधतेचा केलेला आरोप चुकीचा आहे, असं केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यानी म्हटलं आहे.

या बाबत आठवले यांनी आज पत्रक जारी केलं.

मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन देशाचा विकास करणारं सरकार आहे.

मुस्लिम समाजाला संरक्षण देणारे, समान हक्क देणारे, मुस्लिमांचा विश्वास जिंकणारं हे सरकार आहे. शरद पवार हे जातीवादी नाहीत मात्र त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जातीवादी वृत्तीचे काही लोक आहेत, असंही त्यांनी या पत्रकात नमूद केलं आहे.

Hadapsar News Bureau.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *