Health experts advise keeping using the mask even if the danger of the fourth wave is not so great
चौथ्या लाटेचा धोका इतक्यात नसला तरी मुखपट्टी वापरतच राहण्याचा आरोग्य तज्ञांचा सल्ला
येणाऱ्या तीन महिन्यात तरी कोरोनाची चौथी लाट येणार नाही, असा दावा भारतीय वैद्यकीय परिषदेचे राज्याचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी केला आहे. त्याबरोबरच संसर्ग कमी झाला असला तरी गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर नक्की करावा असा सल्ला देखील डॉक्टर भोंडवे यांनी दिला आहे.
राज्य सरकारनं मास्क सक्तीी काढली असली तरी मास्क वापरू नका असं सांगितलं नसल्यामुळं काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. परिस्थिति नियंत्रणात आल्यामुळं राज्य सरकारनं निर्बंध दूर केले आहेत, परंतु कोरोनाची भीती अजूनही असल्याचं भोंडवे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, पुण्यासह बहुतेक प्रमुख शहरांमध्ये या निर्णयानंतर लगेचच मुखपट्टी वापरात कमालीची घट झाल्याचं आढळून आलं आहे. बऱ्याच काळानंतर मोकळा श्वास घेता आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली मात्र वैद्यकीय तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे.
किमानपक्षी गर्दीच्या ठिकाणी जाताना अथवा बाहेर फिरताना लोकांनी मुखपट्टीचा वापर करावा असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.
Hadapsar News Bureau