Do daily yoga to keep diseases away, says Dr Harish Patankar.

Do daily yoga to keep diseases away, says Dr Harish Patankar.

Participants of Suryadatta Kala Arogyam Yogathon-2021 created world records by performing artistic YogaAsanas with Indian ethos and values for the longest duration on the rhythm of patriotic songs and including the maximum number of people. Various books of records have taken cognisance of the attempt of Suryadatta Kala Arogyam Yogathon-2021. 

International Yoga Day
Participants of Suryadatta Kala Arogyam Yogathon-2021

Suryadatta Group of Institutes’s Suryadatta Fitness and Sports Academy (SFSA) organised Suryadatta Kala Arogyam Yogathon-2021 on the occasion of International Yoga Day (IYD) today. This helped to exhibit the amalgamation of Indian culture, art and fitness activity. 

Held at the Bavdhan campus of the Suryadatta Group of Institutes saw the participation of over 100 people. Nayana Godambe, Abhishri Mor, Maruti Marekari, Suchitra Nayak, Dhiraj Jabare, Kanchan Baldota of Prajapita Brahma Kumaris were felicitated on the occasion. Ayurvedacharya Vaidya Harish Patankar, Khushi Parmar and Nupur Pitti Experts in the field of yoga and physical fitness were juries. 

Prof Dr Sanjay Chordia founder president of Suryadatta Group of Institutes, Sushma Chordiya, vice president and secretary of Suryadatta Group of Institutes along with Siddhant Chordiya, Prof Akshit Kushal, Prof Kiran Rao, Prof Suparna Bhattacharya among others were present on the occasion. Sayali Deshpande compared the programme while Prof Sunil Dhadiwal gave a vote of thanks.

On the occasion, Saritaben Rathi said, “Yoga is very important to maintain the fitness of body and mind. It not only increases memory but also helps to control anger. Performing Yoga changes the lifestyle and also curb stress. Positivity, self-respect can be boosted by performing Yoga regularly.”  Vaidya Harish Patankar also addressed the gathering. He said, “Yoga plays an important role to increase immunity. We can keep various diseases at bay by just following a routine of Yoga and a balanced meal.” 

Prof Dr Sanjay B Chordia said, “Yoga sadhana develops mental and emotional orbits along with physical exercises. Yoga is a source of art, creativity, innovation, entrepreneurship, and positive thinking. Today a total of 100 people performed Yoga for two hours in a row through the presentation of art and created a world record.” 

 

आजारांना दूर ठेवण्यासाठी दैनंदिन योगा करावा: वैद्य हरीश पाटणकर.

जुन्या हिंदी व देशभक्तीपर गीतांच्या तालावर आधारित योग प्रात्यक्षिके, सलग दोन तास लयबद्ध सादरीकरण करत ;सूर्यदत्ता कलाआरोग्यम् योगाथॉन-२०२१ने विश्वविक्रम प्रस्थापित केला. सर्वाधिक वेळ, जास्तीत जास्त लोकांनी शरीर व मनाच्या सर्वांगीण विकासासाठी तालबद्ध आर्टिस्टिक योगा करण्याचा हा उपक्रम होता. निमित्त होते, आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये सूर्यदत्ता फिटनेस अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या (एसएफएसए) वतीने सुर्यदत्ता कलाआरोग्यम् योगाथॉन-२०२१ या वैशिष्ट्यपूर्ण आर्टिस्टिक योगाचे आयोजन करण्यात आले होते. देशभक्तीपर गीतांच्या तालावर आधारित सलग दोन तास (Longest duration Yoga) विविध आसनांच्या माध्यमातून योग केला गेला. त्यातून कलेचा आणि आरोग्याचा अनोखा मिलाप पाहायला मिळाला. 

या कलाआरोग्यम् योगाथॉनची दखल विविध बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून घेतली गेली. हा संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आला. सूर्यदत्ताच्या बावधन कॅम्पसमध्ये हे योगाथॉन झाले. जवळपास १०० जणांनी यात सहभाग नोंदवला. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे सभासद सहभागी झाले होते. प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या सरिताबेन राठी यांच्या हस्ते सलग दोन तास उत्कृष्ट योग करणाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ज्युरी म्हणून आयुर्वेदाचार्य वैद्य हरीश पाटणकर, योगपटू खुशी परमार, नुपूर पित्ती यांनी काम पाहिले. 

International Yoga Day
सुर्यदत्ता कलाआरोग्यम् योगाथॉन-२०२१

 प्रसंगी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, मुख्य विन्स्टि अधिकारी सिद्धांत चोरडिया, संचालक प्रा. सुनील धाडीवाल, प्रा. अक्षित कुशल, विभागप्रमुख प्रा. किरण राव, प्रा. सुपर्णा भट्टाचार्य आदी उपस्थित होते. योगशिक्षिका सोनाली ससार व प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी योग प्रात्यक्षिकांचे संचलन केले. सा गोडांयली देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुनील धाडीवाल यांनी आभार मानले. उत्कृष्ट योग सादर केल्याने नयनाबे, अभिश्री भोर,मारुती मारेकरी, सुचित्रा नायक, धीरज जबरे, कांचन बलदोटा यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  

सरिताबेन राठी म्हणाल्या, शरीर व मनाच्या तंदुरुस्तीसाठी योग महत्वाचा आहे. योगसाधनेमुळे मनःशांती लाभते. एकाग्रता वाढते. बदलत्या जीवनशैलीत आरोग्य चांगले राहण्यासाठी, तसेच मानसिक ताणतणाव नियंत्रित ठेवण्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे. सकारात्मक दृष्टीकोन, आत्मसन्मान, रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियमित योग व ध्यानधारणा करायला हवी.  शारीरिक आणि मानसिक प्रतिकारक्षमता वाढवण्यात योग अतिशय महत्वाचा आहे. कोरोना काळात आयुर्वेद आणि योगाच्या साहाय्याने मन व शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत झाली. नियमित योग आणि पोषक आहार घेतला, तर आपण सर्व प्रकारच्या आजारांना दूर ठेवू शकतो, असे वैद्य हरीश पाटणकर यांनी नमूद केले.

 प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, योगाच्या मदतीने मन व शरीर, आचार-विचार, कृती, संयम, सकारात्मक भावना आदी गोष्टींचा समतोल साधला जातो. योग मानवाला निसर्गाशी एकरूप व्हायला लावतो. योगसाधनेमुळे शारीरिक व्यायामासह मानसिक आणि भावनिक कक्षा विकसित होतात. योग म्हणजे कलेचा, क्रयशीलतेचा, नावीन्यतेचा, उपक्रमशीलतेचा, सकारात्मक विचारांचा स्रोत आहे. मन आणि शरीराच्या आंतरिक सौंदर्यासाठी योग करणे गरजेचे आहे.  गाण्यांच्या तालावर आधारित या आर्टिस्टिक योगाची तयारी महिन्याभरापासून सुरु होती. शिक्षक-शिक्षकेतर सर्वच कर्मचारी यामध्ये उत्साहाने सहभागी झाले. एकूण १०० लोकांनी सलग दोन तास कलेच्या सादरीकरणातून योग केला.  हा एक विश्वविक्रमी नोंद होईल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *