Corona outbreak in India is low only because the country has chosen the right vaccine – Adar Poonawalla
देशानं योग्य लस निवडल्यामुळेच भारतात कोरोना रुग्णसंख्या कमी – अदर पूनावाला
पुणे : देशानं योग्य कोरोना प्रतिबंधक लस निवडल्यामुळेच आज भारतात कोरोना रुग्णसंख्या इतकी कमी आहे असं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.
ते काल पुण्यात “पर्यायी इंधनावर आधारीत परिसंवादात बोलत होते “ चीनमध्ये सध्या कोरोनाने हाहाकार माजवला असताना अनेक देशांना कोरोनाच्या चौथ्या लाटेचा फटका बसला आहे.
भारतात सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, महाराष्ट्रात तर सर्व निर्बंध उठवण्यात आले असून, मास्कसक्तीही करण्यात आलेली नाही. भारतात जर कधी करोनाची चौथी लाट आली तर ती सौम्य असेल असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान वर्धक मात्रेसंबंधी आम्ही सरकारला आवाहन केलं आहे. कारण प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला वर्धक मात्रेची गरज आहे.
सरकारमध्ये सध्या अंतर्गत चर्चा सुरु असून, यासंबंधीचं धोरण लवकरच जाहीर केलं जाऊ शकतं, असंही ते म्हणाले. सर्व देश वर्धक मात्रा देत असताना आता भारतानेही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं अदर पूनावाला यांनी सांगितंल आहे.
Hadapsar News Bureau