सांगली आणि सिंधुदुर्गात अवकाळी पावसानं मोठं नुकसान

Great damage due to unseasonal rains in Sangli and Sindhudurg

सांगली आणि सिंधुदुर्गात अवकाळी पावसानं मोठं नुकसान

सांगली/ सिंधुदुर्ग  : सांगली जिल्ह्यात आजही जोरदार गारपीट झाली. मिरज शहरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. शहरात गारांचा खच बघायला मिळाला. सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातGreat damage due to unseasonal rains in Sangli and Sindhudurg हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News, Hadapsar News अवकाळी पाऊस पडला त्यामुळे द्राक्ष पीक धोक्यात आलं असून शेतकरी चिंतेत दिसत आहे.

सांगली, मिरज शहरा सहित जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. गहू, हरभरा , शाळू, कलिंगड, आंबा आणि द्राक्ष पिकांना फटका बसला आहे. मागील तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली आहेत, तर अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. जोरदार वाऱ्यासह पाऊस आंबोली , बांदा सह सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात पडला.
जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या आंबा पिकाचं नुकसान होणार आहे. दरम्यान कालच्या वादळी पावसामुळे मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाडांचे आणि घरांचे नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज केली.

राज्यात येत्या २ दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Hadapsar News Bureau
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *