The NEET examination for medical degree courses for 2022 will be held on 17th July
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांकरता २०२२ साठीची नीट परीक्षा १७ जुलैला होणार
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांकरता २०२२ साठीची नीट ही राष्ट्रीय प्रवेश परीक्षा १७ जुलैला होणार आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा सस्थेनं neet.nta.nic.in या आपल्या संकेतस्थळावर या परीक्षेसाठी नोंदणी सुरु केली आहे.
त्याद्वारे या संकेतस्थाळावरुन उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन भरु शकतात.
देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह १३ भाषांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.
या प्रवेश परीक्षेसाठी भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, वनस्पती शास्त्र आणि प्राणी शास्त्र या विषयांमधले २०० बहुपर्यायी प्रश्न दिले जातील. प्रत्येक विषयांचे ५० प्रश्न दोन भागात विभागले आहेत.
परीक्षेचा कालावधी दुपारी २ ते संध्याकाळी पाच वीस म्हणजेच तीन तास वीस मिनिटं असेल. ही परीक्षा देशातल्या ५४३ शहरांमध्ये, तसंच देशाबाहेरच्या १४ शहरांमध्ये घेतली जाणार आहे. यावेळी नीट परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा ठेवलेली नाही. यापूर्वी ही मर्यादा २५ वर्षांची होती.
Hadapsar News Bureau.