कोरोना लसीकरण प्रमाणपत्रातली चुकीची तारिख दुरुस्त करण्याची सुविधा कोविनवर उपलब्ध

The facility to correct the wrong date in the corona vaccination certificate is available at Covin

कोरोना लसीकरण प्रमाणपत्रातली चुकीची तारिख दुरुस्त करण्याची सुविधा कोविनवर उपलब्ध

नवी दिल्ली : लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर लसीकरणाची तारीख चुकीची पडली असेल, तर ती सुधारण्यासाठी आता कोविन ऍप वर अर्ज करता येईल.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली. कोविन अँप वर लसीकरण तारीख सुधारणेचा पर्याय उपलब्ध करून दिला असून त्यामध्ये लाभार्थ्यांनी लसीकरणाच्या तारखेचा वैध पुरावा अपलोड करायचा आहे.

संबंधित जिल्हा लसीकरण अधिकारी शहानिशा करून लसीकरणाच्या तारखेत बदल करतील. त्यानंतर लाभार्थ्यांना सुधारित तारखेचे प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल. या सुविधेमुळे लाभार्थ्यांना वर्धक मात्र घेताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण होईल असं ते म्हणाले.

Hadapsar News Bureau.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *