देशाच्या ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचं जाळं पसरवायला आयुष्यमान भारत योजनेची महत्त्वाची भूमिका

The important role of Ayushyaman Bharat Yojana in expanding the network of health facilities in rural areas of the country – Dr Bharti Pawar

देशाच्या ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचं जाळं पसरवायला आयुष्यमान भारत योजनेची महत्त्वाची भूमिका -डॉ भारती पवार

नवी दिल्ली : देशाच्या ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचं जाळं पसरवायला आयुष्यमान भारत योजनेनं महत्त्वाची भूमिका निभावली असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी म्हटलंDr Bharati Pawar- Union-State-Health-Minister हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News आहे. त्या आज नवी दिल्ली इथल्या भाजपा मुख्यालयात बातमीदारांशी बोलत होत्या.

भाजपातर्फे आजपासून येत्या २० एप्रिल पर्यंत सामाजिक न्याय पंधरवडा साजरा केला जाणार आहे. त्या अंतर्गत आज आयुष्यमान भारत योजनेविषयी जनजागृती  करण्यात आली.

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत देशातल्या काना कोपऱ्यात आरोग्य आणि कल्याण केंद्र उभारली आहेत. या केंद्रांमध्ये लोकांना डॉक्टरांचा मोफत सल्ला आणि उपचार दिले जातात. काही राज्यांमध्ये लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळत नाही, अशा राज्यांनी लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोचवण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असं आवाहन पवार यांनी केलं.

कोरोना काळात उपचारासाठी या योजनेचा बहुतांश लोकांना फायदा झाला. भाजपाच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त दररोज केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती लोकांना दिली जाईल, असं भाजपाचे प्रवक्ते संदीप पात्रा यांनी यावेळी सांगितलं.

उद्या प्रधानमंत्री आवास योजने बाबत लोकांना माहिती दिली जाणार आहे. ११ एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित कार्यक्रमांचं आयोजन केला जाणार आहे, तर १४ एप्रिलला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचे पदाधिकारी लोकांना केंद्र सरकारच्या कामांची माहिती देतील, असंही त्यांनी सांगितलं.

Hadapsar News Bureau.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *