Government’s emphasis on providing quality healthcare at affordable rates to the poor and middle class in the country: PM
देशातल्या गरीब आणि मध्यमवर्गीयांना परवडेल अशा दरात उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्यावर सरकारचा भर -प्रधानमंत्री
नवी दिल्ली : आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी केंद्र सरकार अथक प्रयत्न करत असून देशातल्या गरीब आणि मध्यमवर्गीयांना परवडेल अशा दरात उत्तम दर्जाची आरोग्य सेवा
देण्यावर सरकारचा भर असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ट्विटरवरून सगळ्यांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. आरोग्य क्षेत्राशी निगडित सर्व व्यक्तींच्या मेहनतीबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.जगातली सगळ्यात मोठी आरोग्य योजना आयुषमान भारत, आपल्या देशात असल्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला असायला हवा, असं ते म्हणाले. एकूणच आरोग्यासाठी सरकार देशभरातलं आयुष जाळं अधिक मजबूत करत आहे, असं त्यांनी सांगितलं.
गेल्या आठ वर्षांत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात वेगानं परिवर्तन घडून आलं आहे. अनेक नवीन वैद्यकीय महाविद्यालय॔ या कालावधीत उभी राहिली, सरकारच्या प्रयत्नामुळे स्थानिक भाषांमधे वैद्यकीय शिक्षण घेता यायला लागलं, त्यामुळे असंख्य तरूणांच्या आकांक्षांना नवे पंख मिळाले, असं प्रधानमंत्री म्हणाले.
Hadapsar News Bureau.