Cash withdrawal facility without ATM Card will be available.
बँकांच्या एटीएम मधून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार.
नवी दिल्ली : सध्या काही बँकांच्या ATM मध्ये सुरू असलेली कार्डविरहीत पैसे काढण्याची सुविधा आता सर्व बँकांच्या ATM मध्ये उपलब्ध होणार आहे.
यामुळं ग्राहकांना इतर बँकांच्या ATM मधूनही कार्डशिवाय पैसे काढता येतील. यामुळं बनावट कार्ड तयार करुन त्याचा गैरवापर करण्याचे प्रकार कमी होतील, अशी आशा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी व्यक्त केली.
ग्राहकांना अधिकाधिक गृहकर्ज मिळावं यासाठी जोखीम निर्धारणाची व्यवस्था पुढच्या मार्चअखेरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला.
बँका आणि इतर वित्तीय संस्थांमध्ये ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवेचा आढावा घेण्यासाठी आणि त्यात सुधारणा सुचविण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. निधी हस्तांतरण सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांनी अवलंब करायच्या सायबर सुरक्षा योजनांसाठी रिझर्व्ह बँक लवकरच दिशानिर्देश जाहीर करणार आहे.
Hadapsar News Bureau.