In the last financial year, direct tax collection has increased by 49% and indirect tax collection by 20%
गेल्या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात ४९ तर अप्रत्यक्ष कर संकलनात २० टक्के वाढ
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रत्यक्ष कर संकलनात ४९ तर अप्रत्यक्ष कर संकलनात २० टक्के वाढ झाली. अर्थ मंत्रालयाचे महसूल सचिव तरुण बजाज यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलतांना ही माहिती दिली.
कोरोनाच्या संकटानंतर आता देशाच्या अर्थव्यवस्था लवचिक स्थितीत आहे, आणि सरलेल्या आर्थिक वर्षात भरघोस कर संकलन झालं, त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलनातही वाढ झाली असं ते म्हणाले.
सरत्या आर्थिक वर्षात देशाचं स्थुल आर्थिक उत्पन्न आणि कर संकलनाचं गुणोत्तर ११ पूर्णांक ७ दशांश टक्के राहीलं, या काळात २२ लाख १७ हजार कोटी रुपयांचा महसुल संकलनाची अपेक्षा अर्थसंकल्पात व्यक्त केली होती, मात्र प्रत्यक्षातलं संकलन २७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होतं अशी माहिती त्यांनी दिली.
या काळातलं वस्तु आणि सेवा कराचं मासिक सरासरी संकलन १ लाख २३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक होतं अशी माहिती त्यांनी दिली.
Hadapsar News Bureau