लोकांच्या मनात महाविकास आघाडीबद्दल असंतोष असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावा

Devendra Fadnavis claims that people are dissatisfied with the Mahavikas Aghadi

लोकांच्या मनात महाविकास आघाडीबद्दल असंतोष असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावा

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय होऊन, नाना कदम हे विधानसभेतले भाजपाचे १०७ वे आमदार असतील, असा विश्वास विधासभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

ते आज कोल्हापूरात बातमीदारांशी बोलत होते. या मतदारसंघात दहशतीचं वातावरण आहे. मात्र लोक दहशत झुगारून मतदान करतील. महाविकास आघाडी सरकारनं पूरग्रस्तांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही.

लोकांच्या मनात महाविकास आघाडीबद्दल असंतोष आहे, असं ते म्हणाले. पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत भाजपाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला, आता कोल्हापुरात अंबाबाईचा आशीर्वाद मिळेल, शिवसेनेचे सगळे मतदार भाजपासोबत आहेत असं ते म्हणाले.

महाराष्ट्र केसरी विजेत्या कोल्हापुरच्या पृथ्वीराज पाटील याला भाजपाच्या वतीनं ५ लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

Hadapsar News Bureau

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *