राज्यातल्या १९ लाख विद्यार्थ्यांचीं आधारकार्ड बोगस, तपासासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत

A three-member committee has been formed to investigate the bogus Aadhaar cards of 19 lakh students in the state

राज्यातल्या १९ लाख विद्यार्थ्यांचीं आधारकार्ड बोगस, तपासासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत

औरंगाबाद : राज्यातल्या १९ लाख विद्यार्थ्यांचीं आधारकार्ड बोगस असल्याची आकडेवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मांडण्यात आल्यानंतर, शैक्षणिक संस्थांमधीलAadhaar Card हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News बनावटगिरीच्या या प्रकरणाच्या तपासासाठी औरंगाबाद खंडपीठानं माजी न्यायमूर्ती पी व्ही हरदास यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे.

या प्रकरणाचा संपूर्ण तपास करुन येत्या ३१ जुलैपर्यंत याबाबतचा अहवाल न्यायालयासमोर सादर करावा असे आदेश देण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथले ब्रिजमोहन मिश्रा यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. २०१२ सालच्या पटपडता‍ळणीत, राज्यात २४ लाख विद्यार्थी बोगस असल्यानं संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती.

Hadapsar  News Bureau

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *