Provision of powers in Pune district under section 36 of the 1951 Act.
Coronavirus is spreading on a large scale in various parts of the Pune rural district. For that, there are restrictions on the communication of citizens. Also, in recent times, milk agitations, other agitations, rallies, marches, demonstrations, etc. are being organized by various parties and organizations in Pune rural district for various demands. The coronation ceremony is on 23rd June 2021. For the above reasons, the possibility of a law and order situation in the Pune rural district cannot be ruled out. To take legal action for this, under Section 36 of the Maharashtra Police Act, 1951, the Superintendent of Police, Dr Abhinav Deshmukh has given the following powers to all Sub-Divisional Police Officers, all Police Thane Officers in charge and all officers in charge of security from 00.5 hrs on 20th June 2021 to 24.00 hrs on 3rd July 2021 as follows.
Instructing people on how to behave or behave in a procession or crowd on the road or on the road, at what time such a procession should or should not be removed in any way, and to prescribe such times, during all processions and gatherings and during worship. And to give proper orders not to obstruct any road or public place or any place which may be crowded or obstructed, on all roads and streets, on ghats or ghats, on all huts and huts, and on public baths, laundry and landing places. To give proper orders to maintain order in temples and all other public places. To regulate and control the playing of drums, tambourines, and other instruments in any street or near the street, and to give appropriate orders for the control of such sound, so as not to disturb the people in any public place or place or any place of public entertainment. The right to regulate and control the use of loudspeakers) and to issue appropriate orders subject to and confirming any order made by the competent authority under sections 33,35,37, 40,42,43 and 45 of these Acts. Superintendent of Police Dr. Deshmukh has informed in a press release that it has been provided.
पुणे जिल्हयात अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये अधिकार प्रदान.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात विविध भागात कोरोना विषाणुचा प्रसार मोठया प्रमाणात होत आहे. त्याकरीता, नागरीकांच्या संचार करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच अलीकडील काळात पुणे ग्रामीण जिल्ह्यात विविध मागण्याकरीता विविध पक्ष व संघटनाकडून दुध आंदोलने, इतर आंदोलने, रॅली, मोर्चे, निदर्शने इत्यादीचे आयोजन केले जात आहे. 23 जून 2021 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा आहे. वरील कारणास्तव पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी कायदेशीर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना 20 जून 2021 रोजी 00.5 वाजता पासून 3 जुलै 2021 रोजी 24.00 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे अधिकार प्रदान केले असल्याचे त्यांनी प्रसिदधी पत्रकान्वये कळविले आहे.
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्याही मार्गाने कोणत्या वेळात काढव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याहुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे, व इतर वाद्ये वाजविणे व गाणी गाण्याचे ,शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविणे विनियम करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनीक्षेपकाचा (लाऊड स्पीकर) उपयोग करणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे, सक्षम प्राधिकाऱ्यानी या अधिनियमांनी कलम 33,35,37, ते 40,42,43 व 45 अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे हे अधिकार प्रदान केले असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.देशमुख यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.