The war in Ukraine is likely to hit developing countries hard
युक्रेन युद्धामुळे दरांमधे झालेल्या वाढीचा फटका विकसनशील देशांना बसण्याची शक्यता
युक्रेन युद्धामुळे जगभरात अन्न आणि ऊर्जा दरांमधे मोठ्या प्रमाणात झालेल्या वाढीचा जोरदार फटका विकसनशील देशांना बसेल असा इशारा आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिला आहे.
सार्वभौम कर्जाच्या ताणाला सामोरे जाण्यासाठी अधिक चांगली यंत्रणा डीफॉल्ट रोखण्यासाठी आवश्यक असल्याचेही यात म्हटले आहे.
अन्न आणि उर्जेच्या किमतीतील वाढ विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या देशांना त्रास देत आहे. अशा देशांना अधिक अनुदान आणि मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरात वित्त सहाय्याची गरज भासेल, असं आयएमएफच्या वित्तीय व्यवहार विभागाचे संचालक विटर ग्लासपर यांनी सांगितलं.
जोखीम टाळण्यासाठी ऋण पारदर्शकता सुधारण्याकरता तसंच कर्जव्यवस्थापन धोरणं मजबूत करण्याकरता या देशांनी तातडीनं सुधारणा हाती घेतल्या पाहिजेत, असं ते म्हणाले.
कमी उत्पन्न असलेल्या देशांपैकी सुमारे ६० टक्के देश आधीच कर्जाच्या दबावाखाली आहेत. आघाडीच्या अर्थव्यवस्थांमधे व्याजदरात होत असलेली वाढ या देशांसाठीचं कर्ज आणखी महाग करणारी ठरेल, असं आयएमएफच्या धोरणप्रमुख सेयला पझरबासीओग्लू यांनी सांगितलं.
चीनकडून परदेशातले कर्ज कमी केल्याने क्रेडिट क्रंच वाढला आहे, जो रिअल-इस्टेट क्षेत्रातील सॉल्व्हेंसी चिंतेने, कोविड-19 लॉकडाउन आणि विकसनशील देशांना सध्याच्या कर्जाच्या समस्यांशी झुंजत आहे.
Hadapsar News Bureau.