Union Health Minister instructs to keep a close watch on new types of Covid patients
नव्या प्रकारच्या कोविड रुग्णांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली आज कोविड-19 या विषाणूच्या एक्सई या उत्परिवर्तित प्रकाराबाबत चर्चा करण्यासाठी देशातील या
क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या तज्ञ व्यक्ती आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
कोविड १९ च्या विषाणूचे नवे प्रकार आणि त्यांची लागण झालेल्या रुग्णांबाबत अधिक बारकाईनं लक्ष ठेवण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोविडवरच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या उपलब्धतेचा आढावा सातत्यानं घ्यावा, तसंच सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला गती द्यावी आणि सर्व पात्र लाभार्थांचं लसीकरण करावं, असे निर्देश त्यांनी दिले.
वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि साधन संपत्ती या घटकांबाबत बोलताना केंद्रीय मंत्री डॉ.मांडवीय यांनी कोविडवरील उपचारासाठी लागणारी अत्यावश्यक औषधांच्या उपलब्धतेचा सतत आढावा घेण्याचे निर्देश बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिले. सध्या सुरु असलेली लसीकरण मोहीम अधिक वेगाने कार्यरत करावी आणि सर्व लाभार्थ्यांना लसीच्या मात्रा देण्यात याव्यात यावर त्यांनी यावेळी अधिक भर दिला.
Hadapsar News Bureau.