A program to update the photographs of voters who do not have photographs in the voter list. 

A program to update the photographs of voters who do not have photographs on the voter list.
Election Commission of India

Chief Electoral Officer of Maharashtra State According to the letter dated 19 November 2020, a program has been announced to update the photographs of the voters who are not on the voter list. Photographs of 32 thousand 371 voters from a total of 274 list areas of 214 Pune Cantonment Assembly constituency do not appear in the voter list. The list of names of voters without this photo has been made available for viewing on the website of District Collector Pune www.pune.nic.in Voters whose photographs are not in the Electoral Roll are requested to submit their recent colour photographs and proof of residency to 214 Pune Cantonment Assembly Constituency, Pune Collectorate, B Wing, 3rd Floor in person or to the polling station level officer within eight days from today. Assembly Constituency Voter Registration Officer Smt. Snehal Bhosale. Further action will be taken to remove the names of voters who have not submitted their residency proofs and photographs during this period, the release said.  

मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्ययावतीकरण करण्याचा कार्यक्रम.    Election Commission of India

 मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे दि. 19 नोव्हेंबर 2020 चे पत्रानुसार मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्ययावतीकरण करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. 214 पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघाच्या एकूण 274 यादी भागामधील 32 हजार 371 मतदारांची छायाचित्र मतदार यादीमध्ये दिसून येत नाहीत. सदर छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या नावांची यादी जिल्हाधिकारी पुणे www.pune.nic.in या वेबसाईटवर पहाणेकरीता उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत त्यांनी त्यांचे अलीकडच्या काळातील रंगीत छायाचित्रे व रहिवास पुराव्यासह 214 पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघ, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, बी विंग, 3 रा मजला येथे समक्ष अथवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे आजपासून आठ दिवसात जमा करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा 214 पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती स्नेहल भोसले, यांनी केले आहे. ज्या मतदारांचे या कालावधीत रहिवास पुरावा व छायाचित्र जमा होणार नाहीत त्यांची नावे मतदार यादीतून वगळणी करणेबाबतची पुढील कार्यवाही प्रस्तावित करणे येईल, असे प्रसिदधी पत्रकात म्हटले आहे. 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *