Sanction to continue National Gram Swaraj Abhiyan Revised Scheme till 31st March 2026
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सुधारित योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत चालू ठेवण्यास मंजुरी
नवी दिल्ली : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ही सुधारित योजना या महिन्याच्या १ तारखेपासून ३१ मार्च २०२६ पर्यंत चालू ठेवायला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं मंजुरी दिली आहे.
या योजनेचा विस्तार सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केला जाईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी नवी दिल्ली इथं बातमीदारांना सांगितलं.
पंचायत राज संस्थांच्या प्रशासन क्षमतांचा विकास करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे २ लाख ७८ हजार ग्रामीण स्थानिक स्वराज संस्थांना शाश्वत विकासाचं ध्येय गाठण्यासाठी मदत मिळेल, सामाजिक न्याय आणि आर्थिक विकासाबरोबरच समता आणि समावेशकतेला चालना मिळेल, असं ते म्हणाले.
या योजनेचा एकूण खर्चाचा आराखडा ५ हजार ९११ कोटी रुपयांचा आहे. त्यात केंद्र सरकारचा वाटा ३ हजार ७०० कोटी रुपये, तर राज्यांचा वाटा २ हजार २११ कोटी रुपये आहे.
Hadapsar News Bureau.