E-Sanjeevani teleconsultation facility will be launched at one lakh centers under Ayushman Bharat
आयुष्मान भारत अंतर्गत एक लाख केंद्रांवर ई-संजीवनी टेलिकन्सल्टेशन सुविधा सुरु होणार
नवी दिल्ली : आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता योजनेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकार उद्या एक लाख केंद्रांवर ई-संजीवनी टेलिकन्सल्टेशन सुविधा सुरु करणार आहे.
आता सर्वसामान्य नागरिकही देशातल्या नामांकित डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतील, असं आरोग्य मंत्री डाॅक्टर मनसुख मांडविया यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.
सरकार आयुष्मान भारताच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य सेवेचं जाळं मजबूत करत आहे. देशात आतापर्यंत एक लाख १७ हजारांहून अधिक आरोग्य केंद्रं कार्यरत आहेत.
Hadapsar News Bureau.
One Comment on “आयुष्मान भारत अंतर्गत एक लाख केंद्रांवर ई-संजीवनी टेलिकन्सल्टेशन सुविधा सुरु होणार”